पुणे - शिवसेना (उबाठा) उमेदवार चेतन पवार आणि सागर ओव्हाळ यांची पदयात्रा
पुणे, 10 जानेवारी, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार पुनावळे गावचे सुपुत्र आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे युवा सेनेचे अधिकारी चेतन महादेव पवार (ड) आणि सागर विजय ओव्हाळ (अ) य
पुणे - शिवसेना (उबाठा) उमेदवार चेतन पवार आणि सागर ओव्हाळ यांची पदयात्रा


पुणे, 10 जानेवारी, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार पुनावळे गावचे सुपुत्र आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे युवा सेनेचे अधिकारी चेतन महादेव पवार (ड) आणि सागर विजय ओव्हाळ (अ) यांना बहुमताने निवडून देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवा. पुनावळे गावच्या सुजान नागरिकांनी या संधीचे सोने करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी केले.

सचिन आहेर यांच्या उपस्थितीत नुकतेच उमेदवार पवार आणि ओव्हाळ यांनी नृसिंह मंदिर, म्हातोबा मंदिर, गणेश मंदिर येथे दर्शन घेऊन परिसरात पदयात्रा काढली. यावेळी सचिन आहेर यांनी मतदारांना आवाहन केले. तसेचउमेदवार चेतन महादेव पवार (ड), सागर विजय ओव्हाळ (अ) यांनी म्हातोबा मंदिर, वाकड गावठाण येथून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी म्हातोबा मंदिर ते उत्कर्ष चौक, दत्त मंदिर, माऊली चौक, यमुना नगर, कॉलनी, सद्गुरु कॉलनी, आदर्श कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, प्रभात कॉलनी या परिसरात काढलेल्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी फुलांच्या पाकळ्या उधळून, महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुण व ज्येष्ठांचा मोठा सहभाग होता.

सामाजिक कार्यकर्ते तानाजी विनोदे, रामदास पवार, अविनाश पवार, संजय पवार, पांडुरंग शिंदे, किसन गराडे, शांताराम सपकाळ, राकेश पवार, बाळासाहेब पवार, धनंजय पवार, किरण पवार, विजय दगडे, रोहन वाघेरे, सुमित निकाळजे, गणेश विनोदे, संतोष कदम, बाळासाहेब ओव्हाळ, विनोद ओव्हाळ, कमलेश ओव्हाळ, राहुल पवार, राजू पवार, स्वप्निल पवार, कृष्णा पवार, योगेश पवार, संकेत पवार, अक्षय भोसले आदींसह ताथवडे, पुनावळे, वाकड गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande