बीड जिल्ह्यात २१.१० लाख मे. टन ऊसाचे गाळप; नऊ कारखाने सुरू
बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये बीड जिल्ह्यात खा. बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१.१० लाख मे. टन ऊसाचे गाळप झालेले आहे. यावर्षी जिल्ह्यात ९ साखर कारखाने सुरू झा
21.10 lakh metric tons of sugarcane crushed in the district, nine factories are operational.


बीड, 10 जानेवारी (हिं.स.)। गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये बीड जिल्ह्यात खा. बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१.१० लाख मे. टन ऊसाचे गाळप झालेले आहे. यावर्षी जिल्ह्यात ९ साखर कारखाने सुरू झालेले असून यातील ६ सहकारी तर २ खासगी कारखान्याचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात एकूण आठ साखर कारखाने ऊस गाळपात कार्यरत असून, आतापर्यंत २१ लाख १० हजार ७७० मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. या गाळपातून १४ लाख ३० हजार ५४५ क्विंटल साखर उत्पादन झाले असून जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ६.७८ टक्के नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील गाळपात सहकारी साखर कारखान्यांची संख्या सहा, तर खाजगी कारखाने दोन आहेत.

सहकारी कारखान्यांनी ११.८५ लाख मे. टन ऊस गाळप करून ८.८९ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यामध्ये साखर उतारा ७.५१ टक्के राहिला. दुसरीकडे, खाजगी कारखान्यांनी ९.२५ लाख मे. टन ऊस गाळप करून ५.४० लाख क्विंटल साखर उत्पादन केले असून त्यांचा साखर उतारा ५.८४ टक्के आहे. खा. बजरंग सोनवणे यांचा येडेश्वरी कारखाना आतापर्यंत सर्वात पुढे आहे. येडेश्वरी अ‍ॅग्रो प्रॉडक्टस,

आनंदगाव (केज) - खाजगी: ४.६७ लाख मे. टन गाळप, २.७१ लाख क्विंटल साखर, छत्रपती सहकारी साखर कारखाना (माजलगाव) १.७५ लाख मे. टन गाळप, १.६१ लाख क्विंटल साखर, जयभवानी सहकारी, गेवराई-२.७७लाख मे. टन गाळप, २.१२ लाख क्विंटल साखर, सुंदररावजी सोळंके माजलगाव सहकारी - ३.१२ लाख मे. टन गाळप, १.६६ लाख क्विंटल साखर, गंगा माऊली शुगर (भाडेतत्वावर), केज -२.६४ लाख मे. टन गाळप, २.३२ लाख किंटल साखर., एन.एस. एल. शुगर, माजलगाव- खाजगी: ४.५८ लाख मे. टन गाळप, २.६९ लाख क्विंटल साखर, डीव्हीपी कमोडिटी एक्सपोर्ट्स (भाडेतत्त्वावर), बीड- ८४ हजार मे. टन गाळप, ६५ हजार क्विंटल साखर, अंबाजोगाई सहकारी, अंबासाखर - ७१ हजार मे. टन गाळप, ५२ हजार क्विंटल साखर.

साखर कारखान्यासोबत बीड जिल्ह्यात गुळाचे कारखानेही जोमात सुरू आहेत. बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वाधिक ऊस गाळप करणारा गुळ कारखाना म्हणून साईप्रसाद नॅचरल शुगरकडे पाहिले जाते. या गुळ कारखान्याने आतापर्यंत १.१० लाख मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. मागील चार वर्षांपासून या गुळ कारखान्याने ऊस गाळपाचा उच्चांक केल्याचे दिसत आहे.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande