अश्लील सामग्री प्रकरणात एक्सने मान्य केली चूक; ३,५०० पोस्ट ब्लॉक, ६०० अकाउंट बंद
नवी दिल्ली , 11 जानेवारी (हिं.स.)।अश्लील सामग्री प्रकरणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने आपली चूक मान्य केली असून भारतीय कायद्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच सुमारे 3,500 कंटेंट ब्लॉक करण्यात आले असून 600 हून अधिक अकाउंट डिलीट करण्यात
केंद्र सरकारच्या आदेशानंतर एक्सकडून ३,५०० पोस्ट ब्लॉक, ६०० अकाउंट बंद


नवी दिल्ली , 11 जानेवारी (हिं.स.)।अश्लील सामग्री प्रकरणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने आपली चूक मान्य केली असून भारतीय कायद्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच सुमारे 3,500 कंटेंट ब्लॉक करण्यात आले असून 600 हून अधिक अकाउंट डिलीट करण्यात आले आहेत. सरकारी सूत्रांनुसार, आता एक्स प्लॅटफॉर्मवर अश्लील छायाचित्रे पोस्ट करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

सूत्रांनी सांगितले की एक्सने आपल्या कंटेंट मॉडरेशन स्टँडर्डमधील त्रुटी स्वीकारल्या असून भारत सरकारला कळवले आहे की ते पूर्णपणे भारतीय कायद्यांचे पालन करेल आणि नियमांनुसार काम करेल. हा मुद्दा तेव्हा समोर आला, जेव्हा प्लॅटफॉर्मवर अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह कंटेंटच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यामध्ये कथितपणे एक्सच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल ‘ग्रोक’च्या माध्यमातून तयार केलेले किंवा वाढवलेले मटेरियलही समाविष्ट होते.

सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सकडे ग्रोक एआयशी संबंधित अश्लील सामग्री रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जातील आणि भविष्यातील योजना काय आहेत, याबाबत अधिक माहिती मागितली होती. एक्सने सविस्तर उत्तर पाठवले, मात्र त्यामध्ये काही महत्त्वाची माहिती नव्हती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ग्रोकसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटचा महिलांच्या लैंगिक आणि अश्लील प्रतिमा तयार करण्यासाठी होणारा गैरवापर थांबवण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

आता एक्सने कारवाई करत सुमारे 3,500 अश्लील कंटेंट ब्लॉक केले असून 600 हून अधिक अकाउंट हटवले आहेत. प्लॅटफॉर्मने पुढे अश्लील छायाचित्रांना परवानगी दिली जाणार नाही, असेही आश्वासन दिले आहे. दरम्यान, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टीका करत सांगितले की ग्रोकद्वारे आक्षेपार्ह आणि लैंगिकदृष्ट्या उत्तेजक प्रतिमा तयार करण्यावर पूर्ण बंदी घालण्याऐवजी, ते फक्त पेड युजर्सपुरते मर्यादित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande