भाजपची 'बेटी बचाओ' फक्त घोषणाच; यशोमती ठाकूर यांची टीका
अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.) बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याची भाजपने स्वीकृ त नगरसेवकपदी नियुक्ती के ल्याने राजकीय वातावरण पेटले आहे. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प
भाजपची 'बेटी बचाओ' फक्त घोषणाच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका


अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.)

बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याची भाजपने स्वीकृ त नगरसेवकपदी नियुक्ती के ल्याने राजकीय वातावरण पेटले आहे. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात भाजपवर जोरदार टीका केली आहे.बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदाची बक्षिसी देणे म्हणजे आश्चर्यच आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरचा मागील निवडणुकीत राजकीय प्रचारासाठी वापर केला. पण आपटेला या प्रक रणात न वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला गेला का मग?, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे. भाजपची 'बेटी बचाओ' फक्त घोषणाच उरली आहे, प्रत्यक्षात भाजप 'गुन्हेगार बचाव' मोहिमेवर आहे. महाराष्ट्राच्या लेकी हे विसरणार नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande