अमरावती - नवनीत राणांच्या उपस्थितीत युती तुटली; अपक्षांना दिला पाठिंबा
अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.)। आगामी १५ जानेवारी रोजी होणान्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि युवा स्वाभिमान पक्ष (वायएसपी) यांच्यातील अघोषित युती अखेर प्रत्यक्षात मोडीत निघाल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. निवडण
भाजपचा युवा स्वाभिमानला घटस्फोट  नवनीत राणांच्या उपस्थितीत युती तुटली, अपक्षांना दिला पाठिंबा


अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.)।

आगामी १५ जानेवारी रोजी होणान्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि युवा स्वाभिमान पक्ष (वायएसपी) यांच्यातील अघोषित युती अखेर प्रत्यक्षात मोडीत निघाल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. निवडणूक प्रचार संपण्यास अवधे चार दिवस शिल्लक असताना भाजपने आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी (वायएसपी) राखीव ठेवलेल्या जागांवर थेट अपक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा आहे.

भाजप-वायएसपी युतीनुसार भाजपने एकूण ७५ जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी प्रभाग क्रमांक ९ मधील तीनपैकी दोन जागा तसेच प्रभाग क्रमांक १७, २० आणि २१ मधीत प्रत्येकी एक जागा युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आल्या होत्या. मात्र आता या सर्व जागांवर भाजपने वायएसपी उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

शनिवारी रात्री चपराशीपुरा परिसरात झालेल्या आयोजित प्रचार सभेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभाग क्रमांक ९ (एसआरपीएफ बडाजी) मधील 'ज' जागेसाठी अनिल सोनटक्केआणि 'क' जागेसाठी गौरी सरबेरे या दोन अपक्ष उमेदवारांना थेट व्यासपीठावर बोलावून त्यांचा प्रचार केला. विशेष म्हणजे, या दोन्ही जागा वायएसपीसाठी राखीव होत्या. यावेळी बावनकुळे यांनी उमेदवारांची नावे आणि त्यांची निवडणूक चिन्हेही जाहीरपणे सांगितली.

महत्त्वाचे म्हणजे, या प्रचार सभेत भाजप नेत्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा किंवा त्यांच्या उमेदवारांचा एकदाही उल्लेख केला नाही. यामुळे भाजपने युती तोडल्याचे स्पष्ट झाले आहे. या सभेला माजी खासदार नवनीत राणा उपस्थित होत्या. त्यांच्या समोरच बावनकुळे यांनी वायएसपी उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळीनवनीत राणा या घडामोडींकडे केवळ स्तब्धपणे पाहताना दिसून आल्या.

दरम्यान, वायएसपीचे प्रमुख आमदार रवी राणा यांनीही अनेक प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांच्या विरोधात स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. माजी खासदार नवनीत राणा यांनीही काही ठिकाणी भाजप उमेदवारांचा प्रचार टाळून बायएसपी उमेदवारांसाठी प्रचार केल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोच्या दिवशीच नवनीत राणा यांनी बॉर्ड क्रमांक १९ मध्ये वायएसपी उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन केल्याने हा बाद अधिकच चिघळला.

या पार्श्वभूमीवर चपराशीपुरा येथील प्रचार सभेत पालकमंत्री बावनकुळे यांनी दिलेला अपक्षांना पाठिंब्याचा स्पष्ट संदेश म्हणजे भाजप-युवा स्वाभिमान युती जवळपास पूर्णपणे संपुष्टात आल्याचे राजकीय संकेत मानले जात आहेत. मात्र याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande