आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात बाईक रॅली
चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शहरातील चार प्रमुख प्रभागांमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाकाली प्रभाग क्र. १२, भानापेठ प्रभाग क्र. ११, ज
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात बाईक रॅली


चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शहरातील चार प्रमुख प्रभागांमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाकाली प्रभाग क्र. १२, भानापेठ प्रभाग क्र. ११, जटपुरा प्रभाग क्र. ७ आणि इडंस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ या भागांत काढण्यात आलेल्या या रॅलीला महिला, पुरुष ,युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाकाली प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपा–शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार प्रज्वलंत प्रमोद कडू, पुष्पा वामन दहागावकर, अविता चंद्रशेखर लडके व राजेंद्र सुधाकर शास्त्रकार यांच्या समर्थनार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही रॅली रजा चौक, जोडदेऊळ मंदिर रोड, धोबी चौक, सुदर्शन चौक, कोहिनूर ग्राउंड मार्गे अंचलेश्वर गेट येथे येऊन पार पडली.

भानापेठ वार्ड प्रभाग क्र. ११ मध्ये भाजपा –शिवसेना –आरपीआय (आठवले गट) महायुतीचे उमेदवार सुरज पेदुलवार, श्रीमती माला पेंदाम, सौ. आशा आबोजवार व संजय कंचर्लावार यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. तसेच जटपुरा वार्ड प्रभाग क्र. ७ मध्ये छबुताई मनोज वैरागडे, भाग्यश्री दिगंबर हांडे, प्रमोद कवडूजी क्षिरसागर व रवि लोणकर यांच्या समर्थनार्थ ही बाईक रॅली काढण्यात आली.

सदर रॅली अंचलेश्वर गेट येथून सुरज पेदुलवार यांच्या कार्यालयापर्यंत, त्यानंतर संजय कंचर्लावार यांचे कार्यालय, जटपुरा गेट, गणेश मंदिर, सवारी बंगला (नगीना बाग), संविधान चौक, जनार्दन मेडिकल चौक, शिवजी हॉस्पिटल मार्गे खंजर मोहल्ला येथे येऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाजवळ रॅलीची सांगता झाली.

या बाईक रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘विकास, सेवा आणि विश्वास’ या संदेशासह शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. विकासाभिमुख विचारधारेचे भाजपा महायुतीचे उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण, समतोल व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असून, चंद्रपूर शहराला भक्कम मूलभूत सुविधा आणि प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत कमळाच्या चिन्हासमोर मतदान करून भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे ठाम आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

इडंस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपा -शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार सौ. राजलक्ष्मी सुधीर कारंगल, सौ सुनीता राधेश्याम जयस्वाल, महेश दशरथ झिटे, चंद्रशेखर उर्फ शेखर सुभाष शेट्टी यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली बिरसा मुंडा चौक- उडिया मोहल्ला-दूधडेअरी चौक-बीएमटी चौक-आस्था चौक- इंडस्ट्रियल एरिया- आदर्श पेट्रोल पंप येथे रॅलीची सांगता झाली. भगवान बिरसा मुंडा यांना पुष्प अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘रेल्वे अतिक्रमणग्रस्त घरांचा प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावला असून, रस्ते, पूल, उद्याने, घरपट्टे, घरकुल योजना, स्वच्छ पाणी व सुसज्ज ड्रेनेजसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढेही आपल्या प्रभागाच्या व चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी मी पूर्ण ताकदीने उभा आहे.’

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande