चंद्रपूरात भाजपचे रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन
चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या वतीने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रोड शो मंगळवारी दुपारी चंद्रपूर शहरात उत्साहात व जल्लोषात पार पडला. य
चंद्रपूरात भाजपचे रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन


चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या वतीने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रोड शो मंगळवारी दुपारी चंद्रपूर शहरात उत्साहात व जल्लोषात पार पडला. या रोड शोमध्ये तब्बल ५ हजारांहून अधिक दुचाकी सहभागी झाल्या होत्या. युवकांचा प्रचंड सहभाग, घोषणांचा गजर आणि पक्षाचे झेंडे यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी पालकमंत्री अशोक उईके, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार मिलिंद नरोटे, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दुपारी ३ वाजता नेहरू नगर जॉगर्स पार्क, बंगाली कॅम्प येथून रोड शोचा प्रारंभ झाला. त्यानंतर आदर्श पेट्रोल पंप, सी.एच.एल. हॉस्पिटल, गुरुद्वारा, जटपुरा गेट, गिरणार चौक, गांधी चौक मार्गे हा रोड शो जोडदेऊळ चौक येथे पोहोचला. येथे रोड शोचे रूपांतर सभेत झाले. मार्गभर नागरिकांनी रोड शोचे उत्स्फूर्त स्वागत केले.

महायुतीच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासकामांचा संदेश घराघरात पोहोचवणे, तसेच महानगरपालिका निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळवणे, हा या रोड शोचा प्रमुख उद्देश होता. युवकांचा जोश, शिस्तबद्ध सहभाग आणि हजारो दुचाकींच्या उपस्थितीमुळे चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले.या रोड शोमध्ये भाजप, शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ५ हजारांहून अधिक दुचाकींच्या सहभागाने पार पडलेला हा रोड शो महायुतीच्या ताकदीचे आणि निवडणुकीतील आत्मविश्वासाचे स्पष्ट दर्शन घडवणारा ठरला. या निवडणुकीत भाजप एकत्रितपणे प्रचाराच्या मैदानात उतरलेली दिसत असताना, काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली. समारोपीय सभेत बोलताना चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande