पराभव दिसू लागल्याने विरोधकांकडून आरोपांचे राजकारण – सुभाष कासनगोट्टूवार
चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव अटळ दिसू लागल्याने काँग्रेस आणि उबाठाकडून भाजपविरोधात खोट्या आरोपांचे राजकारण सुरू झाले आहे. खोट्या स्वाक्षरीचे पट्टे वाटप केल्याचा आरोप हा पूर्णतः निराधार, दिशाभूल करणारा
पराभव दिसू लागल्याने विरोधकांकडून आरोपांचे राजकारण – सुभाष कासनगोट्टूवार


चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव अटळ दिसू लागल्याने काँग्रेस आणि उबाठाकडून भाजपविरोधात खोट्या आरोपांचे राजकारण सुरू झाले आहे. खोट्या स्वाक्षरीचे पट्टे वाटप केल्याचा आरोप हा पूर्णतः निराधार, दिशाभूल करणारा आणि केवळ राजकीय सूडबुद्धीतून प्रेरित असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी केला आहे.

पट्टे वाटप करण्याचा अधिकार हा केवळ जिल्हाधिकाऱ्यांचा असून, भाजपने किंवा कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याने पट्टे वाटप केले असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. नागरिकांनी पट्ट्यासाठी सादर केलेल्या अर्जांची रिसिव्ह कॉपी नागरिकांना देण्यात आली आहे. ती पट्टा नसून अर्जाची पावती आहे, हे माहिती असूनही काँग्रेस आणि उबाठा जाणीवपूर्वक अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande