रामकथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे- सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। रामकथेच्या माध्यमातून संस्कार, अस्मिता आणि मर्यादांचे महत्त्व समाजमनात दृढपणे रुजते. पितृधर्माचे पालन करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे आदर्श पुत्र असून, त्यांचे जीवन मानवतेला योग्य दिशा देणारे आहे. दि. १४ त
रामकथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे- सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर, 13 जानेवारी (हिं.स.)। रामकथेच्या माध्यमातून संस्कार, अस्मिता आणि मर्यादांचे महत्त्व समाजमनात दृढपणे रुजते. पितृधर्माचे पालन करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे आदर्श पुत्र असून, त्यांचे जीवन मानवतेला योग्य दिशा देणारे आहे. दि. १४ ते २२ जानेवारी या कालावधीत दररोज स्थानिक श्री लखमापूर धाम, चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे ही श्रीरामकथा पार पडणार आहे. त्यामुळे जीवनातील नऊ दिवस श्रीरामकथा श्रवणासाठी अर्पण करून ही पवित्र कथा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

श्रीरामकथेच्या पावन निमित्ताने लक्ष्मीनारायण मंदिरापासून चांदा क्लब ग्राउंडपर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. या शोभायात्रेत आमदार सुधीर मुनगंटीवार, पत्नी सौ.सपना मुनगंटीवार आणि मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान मोठ्या संख्येने रामभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून, संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र यांच्या पावन जीवनगाथेवर आधारित श्रीरामकथा दि. १४ ते २२ जानेवारी या कालावधीत भक्तिभावाने आयोजित करण्यात आली आहे. या पवित्र कथासोहळ्यात परमपूज्य राजनजी महाराज हे ग्रामकथेचे वाचक म्हणून उपस्थित राहून श्रीरामकथेचे रसपूर्ण व भावस्पर्शी कथन करणार आहेत.

यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “प्रभू श्रीराम हे संस्कार, अस्मिता, मर्यादा आणि पितृधर्माचे पालन करणाऱ्या आदर्श पुत्राचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन मानवतेला योग्य मार्गदर्शन करणारे आहे. रामकथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे.कारण रामकथेतून जीवन जगण्याची योग्य दिशा, संस्कार आणि मूल्यांची खरी शिकवण मिळते असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande