विकास करायला लोकसेवक हवा, खाजगी सावकार नव्हे - आ. अमित देशमुख
लातूर, 13 जानेवारी, (हिं.स.)लातूर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग १२ आणि १३ मधील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेने लातूरचे राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. संविधान चौकातील या विराट सभेला मिळालेला ''उत्स्फू
विकास करायला लोकसेवक हवा, खाजगी सावकार नव्हे!- आ. अमित देशमुख


लातूर, 13 जानेवारी, (हिं.स.)लातूर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग १२ आणि १३ मधील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेने लातूरचे राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. संविधान चौकातील या विराट सभेला मिळालेला 'उत्स्फूर्त प्रतिसाद' विरोधकांची झोप उडवणारा ठरला आहे.

​सभेतील भाषणातील मुद्दे:

​विकासाचा 'पंचसूत्री' जाहीरनामा: ८० फुटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मनपा शाळेत CBSE शिक्षण, प्रत्येक प्रभागात अभ्यासिका आणि भव्य 'शिवसृष्टी' उभारण्याचा संकल्प.

​सावकारी पाशातून सुटका:

प्रभागाचा विकास करायला लोकसेवक हवा, खाजगी सावकार नव्हे! - आमदार अमित देशमुख यांचा प्रहार.

​भ्रष्टाचाराचा अंत: मनपातील दलाली आणि जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी होणारी लूट थांबवून पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन.

​बाहेरच्यांची लुडबूड नको

लातूरची संस्कृती टिकवण्यासाठी लातूरकर समर्थ आहेत, बाहेरच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.

​जनशक्तीचा पाठिंबा

​या सभेदरम्यान लिंगायत समाज आणि ब्लॅक पँथर युवा संघटनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेस-वंचित आघाडीची ताकद द्विगुणित झाली आहे. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मतदारांना शब्द दिला की, निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या कामाची जबाबदारी आमची असेल!

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande