परभणी - नुकसान भरपाईसाठी ई-पिक पाहणी बंधनकारक
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)।परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसाठी ई-पिक पाहणी बंधनकारक आहे. ई-पिक पाहणीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2026 आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांन
परभणी - नुकसान भरपाईसाठी ई-पिक पाहणी बंधनकारक


परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)।परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसाठी ई-पिक पाहणी बंधनकारक आहे. ई-पिक पाहणीची अंतिम मुदत 15 जानेवारी 2026 आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पिक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई वेळेत व योग्यरित्या मिळावी, यासाठी ई-पिक पाहणी ही आवश्यक अट म्हणून विहित करण्यात आली आहे.

त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची खातरजमा करण्याच्या दृष्टीने ई-पिक पाहणी करणे अनिवार्य असून, ई-पिक पाहणी करण्याची सुधारित अंतिम मुदत 15 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई-पिक पाहणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande