गणेश काजळे पाटील यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील युवा नेते गणेश काजळे पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह परभणीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची महापालिका निवडणूकीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमे
गणेश काजळे पाटील यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश


परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यातील युवा नेते गणेश काजळे पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह परभणीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची महापालिका निवडणूकीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत गणेश काजळे पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत जिंतूर पंचायत समितीचे माजी सभापती वशिष्ट गायकवाड, माजी सदस्य डॉ. विष्णू सानप, भागवत कापूरे, कल्याण इंजे, सुभाष काजळे, भिमराव वाकळे, माधवराव हुलगुंडे, गजानन घुले, हनुमान सांगळे, शेख दिलावर, वैभव डख, मारोतराव मगर, कृष्णा आवरगंड, वैभव काजळे, विशाल दहिवाळ आदींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, राजू कापसे, महानगर जिल्हाध्यक्ष माणिक पौंढे, माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव, माजी महानगर जिल्हाप्रमुख प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande