सोलापूर - घरकुलांच्या छतावरील सौर संचासाठी मिळणार ‘सीएसआर’ फंड
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यावर छतावर सौरसंच बसविण्यासाठी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) फंडातून किंवा शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात
solar


सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यावर छतावर सौरसंच बसविण्यासाठी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) फंडातून किंवा शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने तसा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागणार आहे.घरकुल पूर्ण झाल्यावर लाभार्थीने विद्युतजोडणी केल्याची अधिकाऱ्यांनी खात्री करावी. त्यानंतर ‘पीएम सूर्यघर’च्या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. महावितरणमार्फत पडताळणी करून मंजुरी घ्यावी. लाभार्थीला घरकुलाच्या छतावर सौर संच बसविण्यासाठी पहिल्यांदा स्वत:चे पैसे गुंतवावे लागतील. पण, लाभार्थीकडे पैसे नसल्यास महावितरणचा पुरवठादार शासनाचे अनुदान येईपर्यंत स्वत:ची रक्कम गुंतवायला तयार आहे की नाही?, याची खात्री करावी.दोघेही तयार नसल्यास लाभार्थी बॅंकेतून कर्ज घेऊ शकेल किंवा राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ किंवा प्रभाग संघातून बिनव्याजी, कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकेल. कोल्हापूर व वर्धा जिल्ह्यात असा प्रयोग करण्यात आला आहे. याशिवाय सीएसआर फंड किंवा इतर नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सौरसंच बसविण्यास मदत करता येईल, असेही ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद आहे. सौर संच बसविल्यावर केंद्राच्या ३० हजार आणि राज्याच्या १५ हजार रुपयांच्या अनुदानासाठी लाभार्थी पुढील कार्यवाही करू शकणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande