इराण व्यापारावर टॅरिफ वाढल्यास भारतावरही प्रभाव पडण्याची शक्यता
नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) । व्हेनेझुएलावर कारवाई केल्यानंतर आता इराण ट्रम्प यांच्या रडारवर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्
इराण व्यापारावर टॅरिफ वाढल्यास भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता


नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) । व्हेनेझुएलावर कारवाई केल्यानंतर आता इराण ट्रम्प यांच्या रडारवर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, जो कोणताही देश इराणकडून वस्तू खरेदी करेल, त्याला अमेरिकेसोबतच्या व्यापारावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ भरणे आवश्यक आहे.

ट्रम्प यांच्या या विधानामुळे अनेक देशांचा व्यापार प्रभावित होण्याची शक्यता आहे, विशेषतः भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यावर याचा फटका बसू शकतो. चीन, तुर्की, भारत, UAE, पाकिस्तान आणि आर्मेनिया हे इराणचे सर्वात मोठे व्यापार भागीदार आहेत.

भारतातील व्यापार स्थिती:-

इराणमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये भारताने इराणकडे १.२४ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचा माल निर्यात केला, तर इराणकडून ०.४४ अब्ज डॉलर मूल्याची आयात केली. दोन्ही देशांमधील एकूण व्यापार १.६८ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे १४,००० ते १५,००० कोटी रुपये) इतका आहे.

ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, भारताकडून इराणला होणाऱ्या निर्यातीत सर्वात मोठा वाटा सेंद्रिय रसायनांचा (ऑर्गेनिक केमिकल्स) होता, ज्याची किंमत ५१२.९२ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी होती. त्यानंतर खाद्य फळे, सुकामेवा, लिंबूवर्गीय फळांची साले आणि खरबुजे यांचा व्यापार सुमारे ३११.६० दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका होता, तर खनिज इंधन, तेल आणि आसवनाशी संबंधित उत्पादनांचा व्यापार ८६.४८ दशलक्ष डॉलर इतका नोंदवण्यात आला.

टॅरिफमुळे संभाव्य परिणाम:-

रशियाकडून तेल खरेदीशी संबंधित प्रकरणांमध्ये अमेरिकेने आधीच भारतीय वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला आहे. जर इराणसोबत व्यापार केल्याबद्दल भारतावर आणखी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला गेला, तर एकूण टॅरिफ ७५ टक्के होईल, ज्यामुळे भारत-अमेरिका व्यापार आणखी बाधित होऊ शकतो.

दरम्यान, भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून अशा करारावर काम करत आहेत, ज्यामुळे भारताला टॅरिफमध्ये दिलासा मिळू शकतो. याबरोबरच, या प्रकरणावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची अपेक्षा आहे. न्यायालय ठरवेल की ट्रम्प यांनी लावलेले जागतिक टॅरिफ कायदेशीर आहेत की नाहीत. जर न्यायालयाने ट्रम्प यांच्या विरोधात निर्णय दिला, तर इराणच्या व्यापार भागीदारांवर वेगाने टॅरिफ लावण्याची क्षमता मर्यादित होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निर्णय बुधवारी येण्याची अपेक्षा आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande