पुणे-मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सुट्टी
पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)।पुणे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी मतदान दि.15 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे पुणे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.निवडणूक प्रक्रिया स
पुणे-मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सुट्टी


पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)।पुणे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी मतदान दि.15 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे पुणे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा व सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था आदी पूर्वतयारी व मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या कामकाजासाठी पुणे महानगरपालिका हद्दीतील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय,निमशासकीय कार्यालये, संस्था, सभागृहे, मंगल कार्यालये व इतर इमारती मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे ज्या इमारतींमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्या इमारतींमध्ये दिनांक १४ जानेवारी २०२६ (मतदान पूर्वतयारीचा दिवस) आणि १५ जानेवारी २०२६ (मतदानाचा दिवस) या कालावधीत निवडणूक विषयक कामकाजाव्यतिरिक्त इतर सर्व नियमित कामकाज बंद ठेवण्यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे महापालिका प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande