त्र्यंबकेश्वर येथे लाखो वारकरी दाखल
त्र्यंबकेश्वर , 13 जानेवारी (हिं.स.)। संत निवृत्तीनाथ यात्रा महापूजा करण्याचा मान यंदा मंत्री दादा भुसे यांना मिळणार आहे. पौष वारी एकादशीला पहाटे व चार वाजता ( 14 जानेवारीला मकर संक्रातीला बुधवारी पहाटे) होणारी शासकीय महापूजा शिक्षण मंत्री दादा भु
त्र्यंबकेश्वर येथे लाखो वारकरी दाखल


त्र्यंबकेश्वर , 13 जानेवारी (हिं.स.)।

संत निवृत्तीनाथ यात्रा महापूजा करण्याचा मान यंदा मंत्री दादा भुसे यांना मिळणार आहे. पौष वारी एकादशीला पहाटे व चार वाजता ( 14 जानेवारीला मकर संक्रातीला बुधवारी पहाटे) होणारी शासकीय महापूजा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार पूजेत सामील होतील संत निवृत्तीनाथ मंदिराचे विश्वस्त तसेच मान्यवर यावेळेस उपस्थित राहतील. नगरीत लक्षावधी वारकरी आणि शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत.

नगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या पूजेला शासकीय पूजा असे म्हटले जाते. महापूजा झाल्याने संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला असे मानले जाते.

तत्पूर्वी संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट कडून मध्यरात्री बारानंतर संत निवृत्तीनाथांची षडोपचार महापूजा केली जाते. या पूजेचे पोराइत्य मंदिराचे पुजारी गोसावी बंधू करतात.

दुपारी चार वाजता संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरापासून संत निवृत्तीनाथांचा चांदीचा रथ निघेल यात निवृत्तीनाथांची पालखी आणि मूर्ती असते . मंदिर ते सुंदराबाई मठ केली गल्ली त्रंबकेश्वर मंदिर कुशावर्त संत निवृत्तीनाथ मंदिर व पुन्हा निवृत्तीनाथ मंदिरात असा अडीच तासाच्या वर पालखी सोहळामिरवणूक चालेल यावेळी हजारोच्या संख्येने वारकरी या मिरवणुकीत सामील असतात. त्रंबकेश्वर नगरपालिकेने आरोग्य सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्मळ वारीचे नियोजन केलेले आहे .

नगरपालिका स्तरावर नियोजनाशी संबंधित घटकांना समावून घेत येथे दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे आपत्ती व्यवस्थापना आराखडा राबवण्याच्या दृष्टीने दक्षता पथकात नगरपालिका वीज मंडळ आरोग्य अरे यंत्रणा डॉक्टर्स पोलीस यंत्रणा वन विभाग मंदिर ट्रस्ट फायर बीग्रेड.यांचे महत्त्वाचे मोबाईल नंबर आणि अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट केले आहे. निर्मळ वारीचे आणि स्वच्छ वारीचे नियोजन स्वच्छ सर्वेक्षण तसेच प्लॅस्टिक बंदी याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात आले आहे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी हे तळ ठोकून आहे.

यात्रेकरू भाविकांसाठी सूचना देण्यात येतात. नगरपालिकेने सीसीटीव्ही कक्ष स्थापन केला आहे या गावातील सर्व स्थळांचा सीसीटीव्ही कक्षेत समावेश आहे त्यामुळे नियोजनात सुलभता होत आहे. मुख्याधिकारी , इंजिनियर ,लक्ष घालून आहे.पोलिस

बंदोबस्त तैनात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande