रानवलीत प्रत्यक्ष विकासाचा ठोस अनुभव; बीडीओ जाधव यांचा ऑन-साईट फेरफटका
रायगड, 13 जानेवारी (हिं.स.) – कागदोपत्री योजना नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानावर बदल—हीच मिशन रानवलीची खरी ओळख ठरली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि नरेगा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून रानवली ग्रामपंचायतीने ग्रामीण विकासाला निर्णायक गती द
Mission Ranawali Fatte! NREGA-Panchayat Raj's 'Thunderbolt'; Direct on-site approval of BDOs


रायगड, 13 जानेवारी (हिं.स.) – कागदोपत्री योजना नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानावर बदल—हीच मिशन रानवलीची खरी ओळख ठरली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि नरेगा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून रानवली ग्रामपंचायतीने ग्रामीण विकासाला निर्णायक गती दिली आहे.

श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी थेट ऑन-साईट पाहणी करून कामांना अंतिम ‘ग्रीन सिग्नल’ दिला.

बीडीओ जाधव यांनी फाईल्सपेक्षा प्रत्यक्ष कामांना प्राधान्य दिले. जलतारा, गुरांचे गोठे, कंपोस्ट पीट, घरकुल अभिसरण आणि सुरू असलेल्या विहिरीची तपासणी करून त्यांनी कामांच्या दर्जा, टिकाव आणि वेळपालनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. पाणी व्यवस्थापनाची कायमस्वरूपी सोय, स्वच्छता-सेंद्रिय खतांचा दुहेरी लाभ, आणि घरकुलांना नरेगाच्या मजुरीचे बळ याबाबत समाधान व्यक्त केले.

विशेष लक्ष पाच पानंदरस्त्यांना देण्यात आले. शेतीमाल बाजारात पोहोचवणाऱ्या या रस्त्यांसाठी ‘मिशन मोड’मध्ये तत्काळ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. बीडीओ जाधव यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पायाभूत सुविधा निर्णायक ठरणार असल्याचे ठणकावले.

दौऱ्यात सरपंच सुरेश मांडवकर, ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत माने आणि सदस्य समीर पोपलणकर यांनी नियोजन-अंमलबजावणीची माहिती दिली. बीडीओंनी गौरवोद्गार काढत सांगितले, “नियोजनाची शिस्त आणि अंमलबजावणीची वज्रमुठ असेल, तरच खरे समृद्ध पंचायतराज साकारते.” त्यांनी रानवली ग्रामपंचायतीला इतरांसाठी आदर्श ठरण्याचा विश्वास व्यक्त केला.

रानवलीने फक्त योजनांचा लाभ घेतला नाही, तर त्या यशस्वी करून दाखवल्या. ग्रामीण विकासाचा हा ठोस पॅटर्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande