नाशिक मालेगाव मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला
नाशिकची निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत वादग्रस्तच नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.)।- नाशिक व मालेगाव या दोन महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज मंगळवारी सायंकाळी संपली त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली आहे परंतु या प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप
नाशिक मालेगाव मनपा


नाशिकची निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत वादग्रस्तच

नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.)।- नाशिक व मालेगाव या दोन महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज मंगळवारी सायंकाळी संपली त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली आहे परंतु या प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली पण विकासाचे मुद्दे मात्र त्यापासून काहीसे लांब गेले.

नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्रभागातील 122 नगरसेवकांच्या जागेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे त्यापूर्वी आज मंगळवारी या प्रचाराची सांगता झाली. मागील बारा दिवसापासून सातत्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सुरू होता या प्रचाराची सांगता झाली असून आता उमेदवारांनी गुप्त प्रचार सुरू केला आहे. तर मालेगाव महानगरपालिकेमध्ये 62 जागांसाठी निवडणूक होणार आहे निवडणूक ही सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करायचे आहे.

नाशिक व मालेगाव या दोन महानगरपालिकांपैकी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही राजकीय पक्षांनी देखील विविध स्तरावरती गाजवली त्यामध्ये आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट देणे निष्ठावंतांना डावलने भाजपाचे महत्त्वपूर्ण असलेला एबी फॉर्म पळवा पळवी त्यामध्ये झालेला गोंधळ. शिंदे सेनेचे शेवटच्या क्षणी भाजपा बरोबर युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर युती करणे यासारखे अनेक प्रकार यामध्ये झाले.

या दोन्हीही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक मध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त सहभागीतली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यासह अन्य मंत्र्यांनी नाशिक मध्ये येऊन सभा घेतली नाशिकचे मैदान विविध आरोपांनी गाजवले नाशिकच्या प्रचारामध्ये एमडी ड्रग पासून विविध स्वरूपाचे आरोप झाले महाजनांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुकीचे मैदान कोण मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande