
पिंपरी, 13 जानेवारी (हिं.स.)पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र ‘शिवनेरी’ जिल्हा, सरकारी कार्यालयाचे विकेंद्रीकरण, मेट्रोचा विस्तार, उच्च दाबाने पाणीपुरवठा आणि कल्याणकारी योजनांसाठी विशेष कृती दल स्थापन करण्यासह विविध आश्वासनांचा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा ‘संकल्प शाश्वत विकासाचा’ या घोषवाक्यासह शहरासमोरील आव्हाने सोडविण्याचा संकल्प जाहीरनाम्यात केला आहे. २०३२ पर्यंत पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र लोकसभा मतदारसंघाची मागणी, विधानसभा मतदारसंघाच्या सीमांची पुनर्रचना करून शहराच्या विकासाला राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळवून दिले जाईल. स्वतंत्र ‘शिवनेरी’ जिल्ह्याची निर्मिती केली जाईल.सरकारी कार्यालयाचे विकेंद्रीकरण केले जाईल. एमआयडीसी, महावितरण आणि टपाल विभागाची स्वतंत्र स्थानिक मुख्य कार्यालये शहरात स्थापन केली जातील. शहरातील सहा हजारांहून अधिक गृहनिर्माण संस्थांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र निबंधक कार्यालयाची मागणी केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु