
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण करुन नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, असा गंभीर आरोप पंढरपूर मधील भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेश परिचारक यांनाही भालकेंवर जातीयवादाचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनीही भालकेंवर निशाणा साधला.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आमदार आवताडे यांनी पराभवाविषयी पंढरपुरात पत्रकार परिषदेत भाष्य केले. आमदार आवताडे म्हणाले की, पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी भालके गटाने भाजप उमेदवाराबद्दल फेकनेरिटिव्ह पसरवण्याचे काम केले. याच दरम्यान भगीरथ भालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना भावनिक करुन आणि जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड