
पुणे, 13 जानेवारी, (हिं.स.) - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनधिकृत फ्लेक्स लावून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपने त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, यापुढे भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून शहर घाण करू नये असे आदेश भाजपतर्फे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्स लावू नये असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपनेही कडक भूमिका घेत यापुढे कोणत्याही परिस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आता याचे भविष्यात किती पालन होणे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्यातील १०४ ठिकाणी थेट दाखवण्यात आली. या उपक्रमात सुमारे ५५ हजार नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. ‘घर चलो’ अभियानांतर्गत शहरातील २ हजार ६०० बूथपर्यंत घरोघरी जाऊन भाजपने विकासाचा अजेंडा नागरिकांपर्यंत पोचविला. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकास, पारदर्शक प्रशासन आणि पुण्याच्या भविष्यातील प्रगती यावरच भाजपचा भर दिला, अशी माहिती पांडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु