म्हाडा पुणे मंडळ सोडत पुन्हा लांबणीवर?
पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)। म्हाडाच्या पुणे मंडळाची ४१८६ घरांची सोडत मागील कित्येक महिन्यांपासून रखडली आहे. ही सोडत पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मार्गी लागेल असे वाटत होते. परंतु आता सोडत पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्य
Mhada News Pune  1


पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)। म्हाडाच्या पुणे मंडळाची ४१८६ घरांची सोडत मागील कित्येक महिन्यांपासून रखडली आहे. ही सोडत पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मार्गी लागेल असे वाटत होते. परंतु आता सोडत पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर आता सोडत जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकणार आहे. परिणामी, २ लाख १५ हजार अर्जदारांची चिंता वाढणार आहे.पुणे मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेसह १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत एकूण ४१८६ घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. या घरांची विक्री, वितरण सोडत पद्धतीने करण्यासाठी पुणे मंडळाने सप्टेंबरमध्ये नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती सुरू केली. मात्र या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अर्जविक्री-स्वीकृतीस दोन वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली. परिणामी, सोडत दोन वेळा लांबणीवर गेली. ---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande