
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)। भोगी निमित्त आज भल्या पहाटेपासून रुक्मिणी मातेच्या भोगीपूजेसाठी हजारो महिला भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली आहे.मकर संक्रातीच्या आधीचा एक दिवस भोगीचा सण म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.आज भल्या पहाटेपासून रुक्मिणी मातेच्या भोगीपूजेसाठी हजारो महिला भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली आहे.
भोगीनिमित्त आज पहाटे रुक्मिणी मातेस सुवासिनी महिलांनी एकत्रित येऊन भोगी पूजा केली. यावेळी रुक्मिणी मातेस पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. यानंतर रुक्मिणी मातेस हळदी कुंकू अर्पण करत सौभाग्यलांकरही अर्पण केले गेले.भोगीपूजा झाल्यावर परंपरेनुसार पुरातन असे ठेवणीतील हिरेजडित सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते.साधारणपणे 24 प्रकारचे सोन्याचे हिरेजडित पुरातन अलंकार रुक्मिणी मातेस आज परिधान करण्यात आले.संक्रांत हा महिलांचा सण आहे. याच सणाची सुरुवात पहाटेच्या भोगी पूजेनंतर झाल्यावर महिलांनी मंदिरात एकमेकांना हळदी कुंकू लावत हा सण साजरा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड