साेलापुरात भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार
साेलापुरात भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का


सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग ९ ड मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती.

मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मतदानापूर्वीच घडलेल्या या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आणखी नाट्यमय वळण लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande