खंडाळी जिल्हा परिषद सर्कलसाठी शीतल खोमणे, तर उजना गणातून पार्वतीताई सुरनर यांची उमेदवारी जाहीर
लातूर, 13 जानेवारी, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची खंडाळी जिल्हा परिषद सर्कलची महत्त्वपूर्ण संवाद बैठक मौजे राळगा पाटी येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या ने
खंडाळी जिल्हा परिषद सर्कलसाठी शीतल खोमणे, तर उजना गणातून पार्वतीताई सुरनर यांची उमेदवारी जाहीर


लातूर, 13 जानेवारी, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची खंडाळी जिल्हा परिषद सर्कलची महत्त्वपूर्ण संवाद बैठक मौजे राळगा पाटी येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांशी संवाद साधून उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यावेळी सर्वांच्या संमतीने खंडाळी जिल्हा परिषद सर्कलसाठी सौ. शितलताई प्रदीप खोमणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर उजना पंचायत समिती गणातून माजी उपसभापती देविदासराव सुरनर यांच्या पत्नी सौ. पार्वतीताई देविदासराव सुरनर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

​राळगा पाटी येथील या संवाद बैठकीला खंडाळी सर्कल मधील मतदार, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी प्रदेश सदस्य सोमेश्वर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, प्रदीप खोमणे, सुधीर गोरटे, माजी उपसभापती देविदास सुरनर, राम पाटील, राजेश नरवटे, सरपंच धनराज पाटील, प्रल्हादराव ईपर, व्यंकट पाटील, सुखदेव कदम, प्रकाश देवकते, चंद्रकांत लांडगे, पांडुरंग पोले, भास्कर केंद्रे, तुकाराम देवकते, नारायण कदम, शंकर पाटील, नंदकुमार कांबळे, वाजेद शेख, अर्जुन राठोड, अरविंद राठोड, भगवान जाधव, मंगेश पोले, अर्जुन सुरनर, राम देवकते, संदीप कांबळे, नितीन सूर्यवंशी, मारुती ढवळे, ज्ञानेश्वर शिंगाडे, परमेश्वर पोले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीत एकजुटीने आणि पूर्ण ताकदीनिशी प्रदीपभाऊंच्या पाठीशी उभे राहून उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande