
डोंबिवली, 13 जानेवारी (हिं.स.)कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुक 2026 मध्ये भाजपा - शिवसेना यांच्यात डोंबिवलीत एका प्रभागात समोरासमोर निवडणूक लढत होत आहे. प्रचारादरम्यान दररोज आरोप प्रत्यारोप होत होते. दोन्ही पक्षांनी लढत अटीतटीची केली असल्याने दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला होता. सोमवारी भाजपा महिला उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर रात्रीच्या वेळी शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा केल्याचा आरोप भाजपकडून केला. शिवसेना उमेदवाराने याचा इन्कार केला आहे. मात्र रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार बातमी या प्रकरणी रवि पाटील, नितीन पाटील, यश पाटील, रोशन पाटील व अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला. तसेच शिवसैनिकांनी भाजपच्या काही जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा पदाधिकारी वा कार्यकर्त्यांचा मुकमोर्चा :
पूर्वेकडील प्रभाग क्र. 29 अ, 29 ब, 29 क व 29 ड या प्रभागात भाजपा व शिंदेंची शिवसेना यांचे उमेदवार समोरासमोर उभे आहेत. निवडणूकित दोन्ही पक्षाने एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप होत आहेत. सोमवारी रात्रीच्या वेळी भाजपा महिला उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप भाजपने केला. मात्र शिवसेनेने याचा इन्कार केला आहे. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनांचा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी भाजपाने डोंबिवली पूर्वेकडील सुनीलनगर ते दत्तनगर चौकपर्यंत हाताला काळी फीत बांधून निषेध म्हणून मुकमोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी ही गुंडशाही आणखी किती सहन करायची अशा विषयाचे फलक हातात घेतले होते. मूक मोर्चात भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह प्रभाग क्र. 29 अ, 29 ब, 29 क व 29 ड उमेदवार, पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi