मंगळवेढा आगार दहा लाख उत्पन्नासह जिल्ह्यात प्रथम
सोलापूर, 13 जानेवारी, (हिं.स.)। मंगळवेढा आगाराने डिसेंबर महिन्यात विविध मार्गांवर केलेल्या फेऱ्यांमधून 10 लाख 10 हजारांचे उत्पन्न मिळवून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.सध्या आगाराकडे 61 बसेस कार्यरत असून या बसेसच्या माध्यमातून विविध
st


सोलापूर, 13 जानेवारी, (हिं.स.)। मंगळवेढा आगाराने डिसेंबर महिन्यात विविध मार्गांवर केलेल्या फेऱ्यांमधून 10 लाख 10 हजारांचे उत्पन्न मिळवून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.सध्या आगाराकडे 61 बसेस कार्यरत असून या बसेसच्या माध्यमातून विविध मार्गांवर 384 फेऱ्या केल्या जातात. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी आगाराकडे 136 चालक असून 97 वाहक आहेत. तब्बल 25 वाहकांची संख्या कमी असतानादेखील मंगळवेढा आगाराने जिल्ह्यात उत्पन्नात आघाडी घेतली.

गतवर्षी एसटीची संख्या कमी, त्यामध्ये विविध मार्गांवर बसचा खोळंबा होण्याचे प्रमाणदेखील जास्त होते. पुणे-मुंबईला जाणारे प्रवाशी मंगळवेढा बसेसमधून प्रवास न करता पंढरपुरातून व अन्य बसेसचा पर्याय निवडत होते. अशा परिस्थितीतही आगाराने उत्पन्नात सातत्य ठेवले. आगाराला नुकत्याच नवीन दहा बसेस उपलब्ध झाल्यामुळे चांगली सुविधा देणे सुरुवात झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande