पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असणार - खा. सुप्रिया सुळे
पुणे, 13 जानेवारी, (हिं.स.) - महापलिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या किती जागा निवडून येतील मला माहीत नाही. मी नंबरवर विश्‍वास ठेवत नाही. पण, महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्र
sule


पुणे, 13 जानेवारी, (हिं.स.) - महापलिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या किती जागा निवडून येतील मला माहीत नाही. मी नंबरवर विश्‍वास ठेवत नाही. पण, महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार आहे.' असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये खासदार सुळे सहभाग घेतला. सुळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त लाल महाल येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सुळे म्हणाल्या, भाजपने लोकसभेला ४०० पारचा नारा दिला होता, जे झाले ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे आता भाजपच्या 110 जागा निश्‍चित आहे, यावर माझा विश्‍वास नाही. जर त्या जागा फिक्‍स असतील, तर त्या कशा पद्धतीने फिक्‍स केल्या आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुण्यात किती जागा मिळतील, यापेक्षा पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच महापौर असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande