सोलापूर - स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक
सोलापूर, 13 जानेवारी, (हिं.स.)। मोहोळ नगर परिषदेमध्ये सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुमारे दोन डझन कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करीत हस्ते परहस्ते मागणी केली आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठीही इच्छुकांनी फिल्डिंग
सोलापूर - स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक


सोलापूर, 13 जानेवारी, (हिं.स.)। मोहोळ नगर परिषदेमध्ये सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुमारे दोन डझन कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करीत हस्ते परहस्ते मागणी केली आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठीही इच्छुकांनी फिल्डिंग लावल्यामुळे स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाची लॉटरी नक्की कोणाला लागते? याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे.मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून येऊनही अवघ्या १६९ मतांनी नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे भाजपने वरिष्ठ पातळीवर शहरामध्ये संघटनात्मक काम करण्यावर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या गटनेतेपदी सतीश काळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

भाजपच्या उपनगराध्यक्ष पदासाठीही बेरजेच्या राजकारणासह जातीय समीकरणावर भर देत माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांच्याशी योग्य समन्वय राखत भाजपचेच संघटनात्मक काम करणाऱ्या नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने अनुभवी व आक्रमक अशा दत्तात्रय खवळे यांचे पारडे जड वाटत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande