
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)।
समता- स्वातंत्र्य -बंधुता या संविधानिक मूल्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हे फुले- शाहू- आंबेडकर चळवळीचे मिशन होय यासाठी तरुणांनी समर्पित भावनेने कटिबद्ध व्हावे असे आवाहन थोर अर्थशास्त्रज्ञ तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डाॅ. सुखदेव थोरात यांनी केले.
सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने श्री शिवाजी विधी महाविद्यालय येथे आयोजित राष्ट्रीय विचार उत्सव सोहळ्यात ते बोलत होते .
डॉ. सुखदेव थोरात यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशासन व संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनिय कार्याचा गौरव अधोरेखित करण्याच्या भूमिकेतून या वर्षीचा सम्यक जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ज्ञानोपासक महाविद्यालय रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.भीमराव खाडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला.
सत्कारला उत्तर देताना प्रा. डॉ. भीमराव खाडे यांनी या पुढील काळातही आपण सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महोत्सव समितीचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी तर प्रास्ताविक प्रा.डाॅ.सुरेश हिवराळे, भूमिका प्रा.डाॅ. सुरेश शेळके, परिचय प्राचार्य सारंग साळवी, मानपत्र वाचन इंजी.डाॅ. भीमराव हाटकर प्रा.डाॅ. डॉक्टर भास्कर गायकवाड यांनी केले. यावेळी विचार मंचावर विधि व सेवा प्राधिकरणचे न्यायमूर्ती भूषण काळे इंजी. डॉ.भीमराव हाटकर,दीक्षाभूमी महाविद्यालय नागपूरचे गौतम कांबळे, किशोर खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
परभणी येथील विद्रोही फाउंडेशन, सम्राट मित्र मंडळ आणि शाक्य नगर महिला मंडळ यांना या वर्षीचा मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संविधान प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनाने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला ज्येष्ठ नेते बी.एच. सहजराव, विधीज्ञ माधुरी क्षिरसागर,डॉ.भगवान धुतमल, विधीज्ञ एल. आर. साबळे प्रा.डॉ.सुनील अहिरराव, प्रा. डॉ. आनंद मनवर,प्रा.डाॅ.किर्तीकुमार मोरे,वृक्षमित्र कैलास गायकवाड प्रा.डाॅ.भीमराव बडोले यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेमानंद बनसोडे,प्रा.डाॅ.विजय परसोडे,निशांत हाके, अमित मोगल, त्र्यंबक वडसकर, डाॅ.सुरेश हिवाळे विश्वजीत वाघमारे, संजीव आढागळे, संजय गायकवाड, परमेश्वर जवादे, विश्वजित वाघमारे,संघपाल आढागळे, आनंद सारणीकर,विनय मकरंद, धम्मा काकडे अतुल वैराट,आर्यन बनसोडे,बाबासाहेब पंचांगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis