पुणे - मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्विप) कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोगाकडून परिसरात ठिकठिकाणी मतदार जागृती केली जात आहे. सार्वजनिक स्थापने शाळा महाविद्यालय चौक आदी ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदारांना मतदान करण्याच
पुणे - मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये


पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्विप) कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोगाकडून परिसरात ठिकठिकाणी मतदार जागृती केली जात आहे. सार्वजनिक स्थापने शाळा महाविद्यालय चौक आदी ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी रवि खंदारे, अविनाश पिसाळ व सुनील पाटील यांच्या नियोजनानुसार ही जागृती होत आहे. मांजरी बुद्रुक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक तसेच कर्मचारी यांना निवडणूक पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. तसेच, प्रभागातील चार उमेदवारांना व नोटासाठी मतदान करण्याची पद्धत प्रात्यक्षिकांसह दाखवण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रितेश पाटील यांनी यावेळी महाविद्यालयातील मधील एनएसएस व एनसीसीच्या शंभर विद्यार्थी मुले-मुली यांची निवड करून मतदानाच्या दिवशी ते बूथवर दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांना मदत करतील असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande