राष्ट्रभक्ती व व्यक्तिमत्त्व घडवणारे शिक्षण हवे : विजय जोशी
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)। शिक्षण हे समाजाभिमुख व व्यक्तित्व घडविणारे असायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय हवे. राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याचे काम भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या संस्कार केंद्रात होते, असे मत ज्ये
अ


परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)।

शिक्षण हे समाजाभिमुख व व्यक्तित्व घडविणारे असायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय हवे. राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याचे काम भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या संस्कार केंद्रात होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी व्यक्त केले.

येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आंतरशालेय स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेल्लूरकर, मु.अ. नामदेव एकशिंगे, आंतरशालेय स्पर्धाप्रमुख अनिल कौसडीकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जोशी म्हणाले की, महापुरुषांच्या नावावर हे विद्यालय चालते त्या महापुरुषाच्या विचाराचा जागर आणि त्यांना अभिप्रेत असेलेला नागरिक याच भावनेतून विवेकानंद प्राथमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या आंतर शालेय स्पर्धेतून दिसून येत आहे. विद्यादाना बरोबर समाजाची बांधिलकी कशी जपावी याचीही माहिती विद्यार्थ्यांना या शाळेत देण्यात येते. आगामी काळात विवेकानंद विद्यालयाचा नावलौकिक वाढवा, अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली.प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आंतरशालेय स्पर्धेत बालवाडीसाठी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत श्रीदा महाजन प्रथम, आराध्या थोंबाळ द्वितीय, श्रवण शिंदे, आरव कुलकर्णी व आरणा सुरवसे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता 1ली चित्ररंगभरण स्पर्धेत विवेकानं विद्यालयाच्या आर्यन शिंदे याने प्रथम, के.बा. विद्यालयाच्या आरुषी धबडगे हीने द्वितीय, विवेकानंद विद्यालयाच्या ओजस्वी ठुबे हीने तृतीय क्रमांक पटकावला इयत्ता दुसरी चित्ररंगभरण स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाच्या अनिका वाडकर हीने प्रथम, सिद्धी घुमरे हीने द्वितीय तर के.बा. विद्यालयाच्या नियती मुसळे हीने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता तिसरी चित्ररंगभरण स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या आद्या खजिने हीने प्रथम, विवेकानंद विद्यालयाच्या तन्वी अवचार हीने द्वितीय, तर साक्षी राठोड हीने तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच इयत्ता 4थी सामान्यज्ञान स्कॉलरशिप आधारीत स्पर्धेत नूतन विद्यालयाच्या समृद्धी भुतडा हीने प्रथम, विवेकानंद विद्यालयाच्या अंकित आघाव हीने द्वितीय तर वंशिका आकलोड हनीे तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता 5वी सामान्यज्ञान स्कॉलरशिपआधारित स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाच्या काव्या मरेवार हीने प्रथम, शुभ्रा मुळी हीने द्वितीय तर श्रेयश मुपडे व मधुर कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता 6वी निबंध स्पर्धेत समृद्धी काष्टे प्रथम, आर्या कुलकर्णी द्वितीय, आरुष ताठे तृतीय, इयत्ता 7 वी सामान्यज्ञान स्कॉलरशिप आधारित स्पर्धेत सान्वी शितळे प्रथम, तन्मय भुतडा द्वितीय, अरमान सय्यद तृतीय, इयत्ता 8वी सामान्यज्ञान स्कॉलरशिपआधारित स्पर्धेत अनुजा जवळकर प्रथम, संचिता होगे द्वितीय तर कुंदन पाटील व प्रतीक्षा चिंचोलकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.इयत्ता आठवीसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात कल्याणी काष्टे प्रथम, दिव्या आढे द्वितीय तर सिद्धी गजमल हीने तृतीय क्रमांक पटकावला.

वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण उज्वला धर्माधिकारी, चित्ररंगभरण स्पर्धेचे परीक्षण पांडुरंग पाटणकर, निबंध स्पर्धेचे जयश्री सोन्नेकर यांनी तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण जि. प. प्रशाला राजा येथील मुख्याध्यापक सुखदेव घुले व जि. प. प्रशाला म्हाळसापूर येथील सहशिक्षिका आम्रपाली खाजेकर यांनी केले.

विवेकानंद प्राथमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धेत सुमारे 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन अश्‍विनी पावसे व बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले. प्रास्ताविक नामदेव एकशिंगे यांनी केले. यादी वाचन दीपाली पवार यांनी केले. आभार अनिल कौसडीकर यांनी मानले. सोनाली जोशी यांनी पद्य सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande