शिवसेनेच्या प्रचाराला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद; उदय सामंत यांचे मतदारांना पत्र
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केला आहे. प्रचाराच्या समारोपानंतर त्यांनी पुणे
शिवसेनेच्या संयत आणि संतुलित प्रचाराला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबहुत धन्यवाद; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मतदारांना खुले पत्र


मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केला आहे. प्रचाराच्या समारोपानंतर त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मतदारांना खुले पत्र लिहून आभार मानले आहेत.

या पत्रात सामंत यांनी स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीसाठी प्रयत्न झाले असले तरी, काही पक्षांच्या सत्ताकेंद्रित भूमिकेमुळे शिवसेनेने पुण्यात स्वतंत्र तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. “शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी विचारधारा आणि विकासाभिमुख भूमिका कायम ठेवत संयत आणि सकारात्मक प्रचार केला,” असे त्यांनी नमूद केले.

प्रचारादरम्यान शिवसेनेच्या तरुण आणि प्रामाणिक उमेदवारांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाल्याचे सांगताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा व रोड शोला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे त्याचेच द्योतक असल्याचे सामंत म्हणाले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे ही सांस्कृतिक राजधानी तसेच आयटी, उद्योग आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून, आगामी काळात मेट्रो, विमानतळ, रिंग रोडसह पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी शुद्धीकरण यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande