पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार
पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आता प्रचार शिगेला पोहोचलाय, सर्वच पक्षांनी उमेदवारांनी आपला वचननामा जाहीर केला असून बाणेर, बालेवाडी, पाषाण,सुस–महाळुंगे परिसरातील सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर भाजपने
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार


पुणे, 13 जानेवारी (हिं.स.)। पुणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आता प्रचार शिगेला पोहोचलाय, सर्वच पक्षांनी उमेदवारांनी आपला वचननामा जाहीर केला असून बाणेर, बालेवाडी, पाषाण,सुस–महाळुंगे परिसरातील सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर भाजपने थेट लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी “विकास कागदावर नव्हे, तर रस्त्यावर दिसला पाहिजे” या भूमिकेतून प्रभागातील वाहतूक आणि रस्ते व्यवस्थेसाठी सविस्तर आराखडा जाहीर केला आहे.

बालवडकर यांच्या मते, प्रभागातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे वाहनांचे प्रमाण आणि अपूर्ण रस्ते यामुळे वाहतूक कोंडी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळेच निवडणूक जिंकणे नव्हे, तर ही कोंडी प्रत्यक्षात सोडवणे हेच खरे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.दस मे बस’ने सार्वजनिक वाहतुकीला चालना प्रभागात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘दस मे बस’ योजना राबवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या योजनेत १० किलोमीटरपर्यंत फक्त १० रुपयांत प्रवास करता येणार असल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा दावा करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande