छ. संभाजीनगरात ११ लाख १८ हजार २८३ मतदार करणार मतदान
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी जय्यत तयारी केली आहे. गुरुवारी (१५ जानेवारी) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या दरम्यान १२६७ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जा
छ. संभाजीनगरात ११ लाख १८ हजार २८३ मतदार करणार मतदान


छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर

महापालिका प्रशासनाने गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी जय्यत तयारी केली आहे. गुरुवारी (१५ जानेवारी) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या दरम्यान १२६७ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. ११ लाख १८ हजार २८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरात एकूण २९ प्रभाग असून त्यापैकी १२ प्रभागांसाठी प्रत्येकी चार मतदान यंत्र तर १३ प्रभागांसाठी प्रत्येकी तीन मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीबद्दल सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी पालिका प्रशासनाने एक हजार २६७ केंद्रांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एका केंद्राध्यक्षासह तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राध्यक्षांकडे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, मेमरी, बॅटरी, मार्कर पेन, सील करण्यासाठीचे साहित्य पितळी मोहर हे साहित्य देण्यात येणार आहे. साहित्य ताब्यात घेतल्यावर केंद्राध्यक्ष अन्य तीन कर्मचाऱ्यांसह नेमून दिलेल्या वाहनातून मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी आठ आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात पालिका केंद्रीय प्राथमिक शाळा प्रियदर्शिनी इंदिरानगर, केंद्रीय प्राथमिक शाळा इंदिरानगर बायजीपुरा, केंद्रीय प्राथमिक शाळा बेगमपुरा, प्राथमिक शाळा कांचनवाडी, प्राथमिक शाळा सिडको एन ११, केंद्रीय प्राथमिक शाळा किराडपुरा क्रमांक १, केंद्रीय प्राथमिक शाळा सिडको एन ५, केंद्रीय प्राथमिक शाळा मुकुंदवाडी या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळा महापालिकेच्या आहेत. या सर्व ठिकाणी मंडप टाकण्यात येणार असून वयस्कर मतदारांना बसण्यासाठी सोफासेट - खुच्र्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्तनदा मातांसाठी पाळणाघर, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारच्या खेळण्या असणार आहे.

दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचतील. मतदानासाठी पाच हजार ५८८ अधिकारी कर्मचाऱ्यांची

नियुक्ती करण्यात आली आहे. यात एक हजार ३९७ मतदान केंद्राध्यक्ष, एक हजार ३९७ मतदान अधिकारी क्रमांक एक, एक हजार ३९७ मतदान अधिकारी क्रमांक दोन आणि १३९७मतदान अधिकारी क्रमांक तीन यांचा समावेश असणार आहे. त्याशिवाय क्षेत्रीय अधिकारी व अन्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande