
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)।अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. डिझाईन बॉक्स असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी अजित पवार यांच्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रॉन्चचे अधिकारी डिझाईन बॉक्सच्या कार्यालयात आहेत. त्याठिकाणी ते कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात आहे. मात्र, ही कारवाई नेमकी का करण्यात आली? याबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही. यासंदर्भात कंपनीचे सर्वेसर्वा नरेश अरोला लवकरच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऐन निवडणुकच्या दोन दिवस आधी ही कारवाई करण्यात आल्याने विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु