भोकर पालिकेचे उपनगराध्यक्षपदी दिलीप सोनवाडे
नांदेड, 14 जानेवारी (हिं.स.)।भोकर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दिलीप सोनवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपने उपेक्षित वडार समाजाला पालिकेतील दुसरे सन्मानाचे स्थान दिले. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष भगवा
दिलीप सोनवाडे भोकर पालिकेचे उपनगराध्यक्ष


नांदेड, 14 जानेवारी (हिं.स.)।भोकर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दिलीप सोनवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपने उपेक्षित वडार समाजाला पालिकेतील दुसरे सन्मानाचे स्थान दिले. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

लोकनियुक्त नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी पालिका कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपनगराध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागले होते. मुस्लीमकिंवा मागासवर्गीय समाज, तसेच महिला नगरसेविकेला उपाध्यक्षपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र उपेक्षित वडार समाजाला उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली हे विशेष. मुख्याधिकारी ऋषभ पवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष दंडवे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या सभेत उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक दिलीप सोनवाडे यांनी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, खासदार अशोकराव चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आला. त्यानंतर सोनवाडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड घोषीत करण्यात आली.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande