
अकोला, 14 जानेवारी (हिं.स.)।
राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं..राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अकोल्यातील निवडणुकीत यंदा काही प्रभागांत थेट, तिरंगी आणि चौरंगी अशा चुरशीच्या लढती रंगल्या आहे, तर 11 ते 12 प्रभागात पदाधिकारी व नेत्यांच्या 'बिग फाइट' होत आहेत. भाजप, काँग्रेस, उद्धवसेना, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार पक्ष), वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे या प्रभागांतील निवडणूक रंगतदार झाली आहे.
अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपचे माजी नगरसेवक उमेदवार अनिल मुरूमकर आणि वंचितचे देशमुख यांच्यात लढत आहे.. तर भाजप बंडखोर आशिष पवित्रकार हेही रिंगणात आहेत. तर 5 मध्ये दोन जागांवर थेट 'बिग फाइट' होत आहे. प्रभाग ५-बमध्ये भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने आणि उद्धवसेनेचे मनीष मोहोड आमने-सामने आहेत, तर प्रभाग ५-ड मध्ये भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याविरोधात उद्धवसेनेचे नवखे दीपक गवारे, काँग्रेसचे रवी पाटणे आणि वंचितचे शुद्धोधन पळसपगार यांच्यात चौरंगी लढत आहे. प्रभाग ६-क मध्ये माजी नगरसेविका सारिका जयस्वाल आणि भाजप गटनेते राहुल देशमुख यांच्या अर्धांगिनी निकिता देशमुख यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. प्रभाग ७-ड मध्ये महानगर विकास समितीचे माजी उपमहापौर सुनील मेश्राम, माजी नगरसेवक शेख फरीद, एमआयएमचे रशीद खान लोधी आणि वंचितचे महेंद्र डोंगरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. तर 3 मध्ये वंचितचे निलेश देव आणि भाजपचे सागर शेगोकार यांच्यात लढत आहे..
१५ मध्ये अनुभवी विरुद्ध नवखे
प्रभाग १५-डमध्ये मनपा स्थायी समितीचे माजी सभापती भाजपचे बाळ टाले यांच्या समोर गेल्या वेळीही निवडणूक लढलेले उद्धवसेनेचे लक्ष्मण पंजाबी, शिंदेसेनेचे समर्थ शर्मा आणि काँग्रेसचे प्रशांत प्रधान यांच्यात बहुरंगी लढत होताना दिसत आहे. अनुभवी विरुद्ध नवखे अशी ही लढत होत असल्याने, यालढतीकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग १६, १७ आणि २० : प्रतिष्ठेचा सवाल
प्रभाग १६-ड मध्ये भाजपचे माजी स्थायी समिती सभापती संजय बडोणे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी स्थायी समिती सभापती रफिक सिद्दीकी यांच्यात काट्याची लढत होत आहे.
प्रभाग १७-ड मध्ये भाजपचे करण साहू यांच्यासमोर काँग्रेसचे आझाद खान, शिंदेसेनेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक राजेश मिश्रा आणि एआयएमआयएमचे फैसल अहमद यांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे या चौघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. या सर्वांच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
अशा असणार बिग फाईट!
अकोला..
महानगरपालिकेतील 20 प्रभागातील 80 जागांसाठी ही निवडणूक आहे.
1) प्रभाग क्रमांक 12 मध्ये संगीता भारगड राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प ) विरुद्ध उषा विर्क शिवसेना एकनाथ शिंदे.
2 ) प्रभाग क्रमांक 6 मध्ये सारिका जयस्वाल, शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध निखिता देशमुख ,भाजप.
3) प्रभाग क्रमांक 17 मध्ये करण शाहू , भाजप विरुद्ध राजेश मिश्रा शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध आझाद अलियार खान, काँग्रेस.
4) प्रभाग क्रमांक 5 मध्ये विजय अग्रवाल , भाजप विरुद्ध नंदकिशोर ढोरे , अपक्ष.
5) प्रभाग क्रमांक 15 मध्ये हरीश अलीमचंदानी, भाजप विरुद्ध भूषण संजय चौधरी, शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध पंकज साबळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
6) प्रभाग क्रमांक 3 मध्ये निलेश देव , वंचित बहुजन आघाडी विरुद्ध सागर शेगोकार , भाजप.
7 ) प्रभाग क्रमांक 20 ( ड ) मध्ये विनोद मापारी , भाजप विरुद्ध शंकर लंगोटे, उबाठा.
8) प्रभाग क्रमांक 20 ( क ) विजय इंगळे, उबाठा विरुद्ध मंगेश झिने , भाजप.
9) प्रभाग क्रमांक 13 भाजप बंडखोर आशिष पवित्रकार विरुद्ध भाजप उमेदवार अनिल मुरूमकर
10)प्रभाग क्रमांक 14 मंगेश काळे शिवसेना उभाठा विरुद्ध दिलीप भरणे भाजप
11) प्रभाग क्रमांक 5 माजी महापौर विजय अग्रवाल विरुद्ध दीपक गवारे, शिवसेना उभाठा
12) प्रभाग क्रमांक 5 जयंत मसणे भाजप विरुद्ध मनीष मोहोड शिवसेना उभाठा
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे