निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही – मुरलीधर मोहोळ
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.) । पुणे महापालिकेची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहील, असे वाटत होते. मात्र विरोधकांनी आरोप केल्याने त्याला प्रत्युत्तर देणे भाग पडले, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार
निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही – मुरलीधर मोहोळ


पुणे, 14 जानेवारी (हिं.स.) । पुणे महापालिकेची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहील, असे वाटत होते. मात्र विरोधकांनी आरोप केल्याने त्याला प्रत्युत्तर देणे भाग पडले, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण कोणतीही नुराकुस्ती करत नसून, निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर उपस्थित होते. मोहोळ म्हणाले की, आपण इतर नेत्यांप्रमाणे आक्रमक भाषा वापरत नसले तरी शांततेत क्रांती घडवणारा कार्यकर्ता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर गुंड नीलेश घायवळ याला परदेशात जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केल्याचा उल्लेख करत मोहोळ यांनी सांगितले की, या आरोपांबाबत त्यांनी खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले होते. “जर आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, अन्यथा अजित पवारांनी राजकारण सोडावे,” असे खुले आव्हान दिले होते. मात्र अजित पवार चर्चेला आले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

तसेच अजित पवार यांनी सचिन खरात यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)’शी युती करून आठ जागा दिल्या. त्यापैकी चार जागांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे सचिन खरात यांनी हे उमेदवार आमचे नाहीत, असे जाहीर केले आहे. यावर अजित पवारांनी खुलासा करावा, अशी मागणीही मोहोळ यांनी केली.

-----------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande