मनमाड नगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपाचा उपनगराध्यक्ष
मनमाड. , 14 जानेवारी (हिं.स.)। येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदा साठी आज(मंगळवार) झालेल्या निवडणुकीत भाजपाचे एकमेव नगरसेवक असलेले मुकुंद एळींजे यांची बिनविरोध निवड झाली.उपनगराध्यक्ष पदासाठी एळींजे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे पीठासीन अधिकारी नगरा
मनमाड नगरपालिकेत पहिल्यांदाच


मनमाड. , 14 जानेवारी (हिं.स.)।

येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदा साठी आज(मंगळवार) झालेल्या निवडणुकीत भाजपाचे एकमेव नगरसेवक असलेले मुकुंद एळींजे यांची बिनविरोध निवड झाली.उपनगराध्यक्ष पदासाठी एळींजे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले शिवाय पालिकेच्या या विशेष सभेत शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.एळींजे यांची उपनगराध्यक्षपदी आणि मयूर बोरसे यांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटक्याची आतिषबाजी करत ढोल ताशे वाजवून एकच जल्लोष केला. दरम्यान पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा मी एकमेव उमेदवार निवडून आल्यानंतर देखील आमदार सुहास कांदे,अंजुम कांदे आणि युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान खान यांनी मला थेट उपनगराध्यक्ष पदावर संधी दिली त्यामुळे मी त्यांचा ऋणी असल्याचे नूतन उपनगराध्यक्ष मुकुंद एळींजे यांनी सांगितले.तब्बल 15 वर्षा नंतर पालिकेत एळींजे यांच्या रूपाने भाजपची एन्ट्री झाल्यानंतर भाजपला उपनगराध्यक्ष पद ही मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तब्बल 9 वर्षा नंतर नगर परिषदेची निवडणूक होऊन त्यात थेट नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचे योगेश पाटील सह 31 पैकी सेनेचे 23 आणि भाजपचा एक नगरसेवक निवडून आला आहे कॉंग्रेस नगरसेवक बब्बू कुरेशी आणि अपक्ष नगरसेविका रेश्मा पगारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेची संख्याबळ 27 झाल आहे.गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाल्यानतर आज मंगळवारी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दुपारी अडीच वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते,निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे मुकुंद एळींजे यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले शिवाय स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी गटनेते पिंटू सिरसाट यांनी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या नावाची शिफारस जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती त्यांनी त्याला मान्यता दिल्यामुळे आजच्या विशेष सभेत बोरसे यांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले.सभेला सर्व 31 नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होते त्यात विरोधी गटअसलेल्या उबठाचे 4 ही नगरसेवक सेविकांचा समावेश आहे. एळींजे यांची उपनगराध्यक्ष पदी आणि मयूर बोरसे यांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटक्याची आतिषबाजी करत ढोल ताशे वाजवून एकच जल्लोष केला.यावेळी आमदार सुहास कांदे,अंजुम कांदे यांच्या वतीने उपनगराध्यक्ष यांचा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान खान,नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी तर प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी अभिनंदन करून सत्कार केला,उपनगराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये सेनेचे अनेक नगरसेवक होते मात्र आमदार सुहास कांदे मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या एकमेव असलेल्या नगरसेवकाची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लाऊन एक मोठा संदेश दिला.पालिकेत सत्ताधारी शिवसेनेचे संख्याबळ पाहता त्यांना 3 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार आहे मात्र सध्या फक्त एकच नगरसेवक नियुक्त करण्यात आला त्यामुळे आणखी दोन स्वीकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागणार यावर सस्पेन्स कायम आहे

पालिकेच्या इतिहासात भाजपला पहिल्यादांचं मिळाली कॅबिन...!मनमाड नगर पालिका व भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच मुकुंद एळीजे यांच्या रूपाने उपनगराध्यक्ष पद मिळाले आहे विशेष म्हणजे भाजपचे याआधी नारायण फुलवाणी, सचिन दराडे यांच्या रूपाने नगरसेवक होऊन गेले मात्र उपनगराध्यक्ष हे पहिल्यांदाच मिळाले आहे त्यामुळे पालिकेच्या व भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच नगर पालिकेत कॅबिन मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande