
नंदुरबार,, 14 जानेवारी (हिं.स.) शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक निबांजी पाटील यांनी कळविले आहे. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश एमएसएमई (MSME) क्षेत्राला निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे हा असून एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम आणि उद्योगाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त निर्यातक्षम उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक श्री. पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर