पुणे : मतदानाकरिता गुरुवारी सुट्टी-कामगार उपआयुक्त
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता १५ जानेवारी २०२६ रोजी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनानी भरपगारी सुट्टी तथा सुट्टी देणे शक्य नसल्यास सवलत देण्यात यावी, असे
PMC news


पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)।

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता १५ जानेवारी २०२६ रोजी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनानी भरपगारी सुट्टी तथा सुट्टी देणे शक्य नसल्यास सवलत देण्यात यावी, असे आवाहन कामगार उपआयुक्त निखील वाळके यांनी केले आहे.

उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या ३० डिसेंबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी.) मधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तेथे दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत सूचित केले आहे.

कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने मालकांनी, व्यवस्थापनाने परिपत्रकातील निर्देशाचे तंतोतंत पालन करण्याची खबरदारी घ्यावी. आपल्या आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द मा. निवडणूक आयोग व शासनाने निर्देशित केल्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग व कामगार उप आयुक्त कार्यालयाच्या alcpune5@gmail.com व dycl2021@gmail.com या ई-मेल पत्त्यावर आस्थापनेचे नाव, जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करुन तक्रार दाखल करावी.

यासंदर्भात अधिक माहिती व तक्रारीकरिता सहाय्यक कामगार आयुक्त प्रविण बा. जाधव - ९५२९६११८०७, ग. स. शिंदे-९७३०१२११५२, द. दा. पवार- ९८२२७३३३७०. सु. तु. शिर्के- ७७७५९६६६०६, कै. ल. मुजमुले-९८२३९९७७२२ आणि अधीक्षक व. पं. सोनंदकर-९९६०५५७११६ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपआयुक्त निखील वाळके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande