
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात १५ आणि १६ जानेवारीदरम्यान सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. या कालावधीत काही प्रमुख रस्ते पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रांच्या परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत वाहतुकीत बदल करण्यात येतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.शिवसेना चौक ते साने गुरुजी परिसरापर्यंतचा मार्ग बंद राहणार आहे. यासाठी हडपसर वेस- अमरधाम स्मशानभूमी- माळवाडी- शिवसेना चौक- डीपी रस्ता मार्ग तसेच, हडपसर गाडीतळ- संजिवनी हॉस्पिटल - डीपी रस्त्याने सिद्धेश्वर हॉटेलकडे जाणारा मार्ग पर्यायी म्हणून वापरता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु