
नंदुरबार, 14 जानेवारी (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, , काकेश्वर विद्याप्रसारक संस्था आणि श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर यांच्या संयुक्त विद्यमाने 16 जानेवारी, 2026 रोजी श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, एकूण 549 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये बांसवाडा गारमेंट दमन (गुजरात), महिंद्रा अँड महिंद्रा सातपूर नाशिक, हिताची जळगाव, जे. के. मैनी सिन्नर नाशिक, रेमंड प्रा. लि. जळगाव, छबी इलेक्ट्रीकल जळगाव, सुप्रीम इक्किपमेंटस प्रा. लि. नाशिक, सांची एंटरप्रायझेस नाशिक, लग्रो प्रा. लि. जळगाव, मंजुश्री प्रा. लि. जळगाव, डेन्टा मॅन्युफॅक्चरिंग नाशिक, सारंग टी ऑटो प्रा. लि. नाशिक, आणि संयोग प्रा. लि. नाशिक इत्यादींचा समावेश आहे. बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. वाघ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर