
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील हिवाळी सत्र परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यातील वास्तुविशारद पदवी अभ्यासक्रमासह व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अशा जवळपास १५ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षांचे निकाल ‘https://onlineresults.unipune.ac.in/Result/Dashboard/Default’या संकेतस्थळावर विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत.विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार बी.आर्च (प्रथम वर्ष-२०१९ पॅटर्न), एमबीए (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), एम.ई (प्रथम आणि द्वितीय वर्ष- २०१७ पॅटर्न), एमसीए (प्रथम आणि द्वितीय वर्ष- इंजिनिअरिंग, २०२० पॅटर्न), एमबीए (प्रथम आणि द्वितीय वर्ष, सर्व्हिस मॅनेजमेंट), एमबीए (प्रथम आणि द्वितीय वर्ष, प्रोजेक्ट मॅनेजमेंट), एमबीए (प्रथम आणि द्वितीय वर्ष, फिनटेक), एमबीए (प्रथम आणि द्वितीय वर्ष, डिजिटल मार्केटिंग), एफ.ई ( २०१९ पॅटर्न) या अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल जाहीर केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु