संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा
त्रंबकेश्वर, 14 जानेवारी (हिं.स.)। संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पहाटे त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. मंत्री भुसे यांच्याबरोबर दिंडोरी तालुक्याती
संत निवृत्तीनाथ महाराज


त्रंबकेश्वर, 14 जानेवारी (हिं.स.)। संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पहाटे त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. मंत्री भुसे यांच्याबरोबर दिंडोरी तालुक्यातील गणपत गाडेकर, सौ. गाडेकर यांना पूजेचा मान मिळाला. यावेळी अनिता भुसे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पोलिस उप अधीक्षक वासुदेव देसले, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, पुजारी जयंत महाराज गोसावी आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापूजेनंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री भुसे म्हणाले की, पौष वारी निमित्त संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीच्या दर्शनाची संधी मिळाली. राज्यातील शेतकरी, कामगार आणि नागरिकांच्या जीवनात सुख, समृध्दी येऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येईल. या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू असते. त्यांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल. नगराध्यक्षा श्रीमती तुंगार, माधवदास राठी, भूषण अडसरे, अक्षय भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. पौष वारी निमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande