
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम मतदार यादी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विभागात एकूण मतदारांची संख्या २ लाख ८८ हजार ७८३ असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
१ नोव्हेंबर २०१५ हा अर्हता दिनांक निश्चित करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत विभागात २ लाख ४० हजार ५४९ मतदारांची नोंद होती. त्यानंतर मतदार यादीत नव्याने नावे यादीत समाविष्ट करावयाच्या मुदतीत प्राप्त अर्जाच्या छाननीअंती ४८ हजार २३४ नावे
हिंगोली नव्याने समाविष्ट करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (८०८८६), जालना (३१९४३), परभणी (२३५६४), (९०९९), नांदेड (३४८२१), लातूर (२७६८८), धाराशिव (२६८७६) आणि बीड जिल्ह्यात (५४२०६) असे एकूण २ लाख ८८ हजार ७८३ नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये २ लाख २१ हजार १६१ पुरुष मतदार ६७ हजार ६०९ महिला तर १३ इतर मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया यापुढेही चालू राहणार आहे, असेही प्रशासनाने नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis