धुळे : शिरपूर येथे १७ जानेवारीपासून ग्रंथोत्सवाचे आयोजन
धुळे, 14 जानेवारी (हिं.स.) : ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ, साहित्य विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत. यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, राज्य, मुंबई, जिल्हाग्रंथालय अधिकारी क
धुळे : शिरपूर येथे १७ जानेवारीपासून ग्रंथोत्सवाचे आयोजन


धुळे, 14 जानेवारी (हिं.स.) : ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ, साहित्य विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत. यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, राज्य, मुंबई, जिल्हाग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुे आर.सी.पटेल कॉलेज, फार्मसी कॅम्पस शिरपूर करवंद नाका शिरपूर येथे १७ व १८ जानेवारी, २०२६ रोजी धुळे ग्रंथोत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील यांनी दिली .

ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा: शनिवार १७ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आर.सी.पटेल मुख्यइमारत, शिरपूर येथे ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सावाची सुरुवातहोणार आहे. या ग्रंथदिंडीचे उद्घाटनशिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते होणार आहे. या ग्रंथदिंडीतशिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सचिवरेशा पटेल, व्यस्थापन समिती सदस्य डॉ.संजय सुराणा, अहिराणीसाहित्यिक सुभाष अहिरे यामान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिडीनिघणार आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पणन व राज्यशिष्टाचारमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीजयकुमार रावल यांच्या प्रमुखउपस्थितीत सकाळी ११ वाजता संपन्न होईल. ग्रंथोत्सवकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वश्री आमदार अमरिशभाई पटेल हेशिरपूर येथे १७ जानेवारीपासून ग्रंथोत्सवाचे आयोजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार उद्घाटन ग्रंथदिंडी,परिसंवाद,कथाकथन,कवीसंमेलन,सांस्कृतिक कार्यक्रमांसह ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande