
सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)। कर्नाटकातून ट्रक भरून सुपारी घेऊन जाणारा ट्रक सोलापूर-तुळजापूरमार्गे नागपूरला निघाला होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तुळजापूर नाक्याजवळ ट्रक पकडला. ट्रकमधून ३५० पोती (२४,४९८ किलो) सुपारीची वाहतूक केली जात होती. सुपारीची एकूण किंमत ६४ लाख ९१ हजार ९७० रुपये इतकी आहे. सुपारीत भेसळीचा संशय असून मावा बनविण्यासाठी सुपारीचा वापर केला जाणार होता का, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रात गुटखा बंदी केली आहे. तरीपण, राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शहर-ग्रामीण हद्दीत ओला- सुका मावा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला सर्रासपणे विकला जातो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून छापेमारी, धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, कर्नाटक राज्यातून सोलापूरमार्गे नागपूरला सुपारी घेऊन एक ट्रक निघाला होता. खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी यांचे पथक सोलापूर-तुळजापूर रोडवर पोचले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड