
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर निवडणुकीसाठी महापालिकेच्या निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (तिसरा डोळा) नजर असणार आहे. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण स्मार्ट सिटी कार्यालयातून केले जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण देखील याच कार्यालयातून केले जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्याची संपूर्ण तयारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या प्रशासनाकडून देण्यात बद्दल तथा आलेल्या माहितीनुसार प्रशासक
निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार ५३७ मतदान खोल्यांच्या आत वेब कास्टिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत, याच मतदान खोल्यांच्या बाहेर देखील वेब कास्टिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वेब कास्टिंग कॅमेरे बसवण्यात येणाऱ्या मतदान खोल्यांमध्ये संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांचा देखील समावेश आहे. या सर्व ठिकाणी मिळून १०७४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्य माध्यमातून स्मार्ट सिटी कार्यालयातून सर्व ठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी अतिरिक्त आयुक्त मार्गदर्शनाखाली यांच्याउपायुक्त, शाखा प्रमुख, सिस्टीम मॅनेजर, स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis